पाऊस थांबल्यावर | Paus Thamblyavar | Poem Video

Post - Production - Tambe Amit Studios
Written | Music | Voice -  Siddhesh Sunil Pawar
Special Thanks - Vikrant Nivate, Manoj Bhagde

Lyrics ( कविता )
पाऊस थांबल्यावर
तुझं मन धावत असेल
पाय पोहचत असतील
कुठल्या तरी कुंपणावर........
भिजलेल्या अबोली वर.......

रात्र सरत ही असेल
काळोखात सुई ओवताना
गजरा विणतांना.....
थोडीशी अबोली उरतही असेल.........
पाऊस पुन्हा बरसताना.........

फक्त सकाळीच विसरशील
तोच गजरा
तीच अबोली........
ऑफिस ला पोहचल्यावर
आठवेल फक्त.....
तोच गंध
तेच कुंपण
तोच बरसणारा पाऊस......
आणि खिडकी वरती पाकळ्या मिटून सुन्न पडलेला
गजरा.......


पाऊस थांबल्यावर
तुझं मन धावत असेल...





Follow Us On Facebook  -  https://www.facebook.com/tambeamitstudios/

Follow Us On Instagram - https://www.instagram.com/tambeamitstudios/